मेनू बंद

ताईमहाराज

प पू ताईमहाराजांचा संक्षिप्त परिचय


प पू ताईमहाराजांचा जन्म १९४० सालच्या श्रीराम नवमीला जालन्यात झाला़. वडिल प पू श्री काजळकरमहाराज उर्फ अण्णा त्यांच्या या शशिकलेला प्रेमाने “शशाबाई” अशी हांक मारीत़. जन्मानंतर कांही महिन्यांनी अण्णांनी छोट्या शशाबाईना देऊळगांवराजाला नेले आणि प पू श्री धुंडिराजमहाराजांच्या मांडीवर ठेवून त्यांनी प्रार्थना केली, “महाराज, ही आपली मुलगी आहे़ आपण हिचा सांभाळ करा़.’’ त्या दिवसापासून श्रीधुंडिराजमहाराज व थोरल्या आईसाहेबांनी शशाची जबाबदारी स्वीकारली़. सुरवातीची ७-८ वर्ष शेषा श्री धुंडिराजमहाराजांच्या कृपाछत्राखाली राहिली आणि तिथेच शशाबाईवर भक्तीमार्गाचे, अध्यात्मविद्येचे दृढ संस्कार झाले़. पुढे शशाबाई मामा मामींच्याकडे जालन्यात राहिली़. त्या कधी लहानपणी बालसुलभ खेळ खेळल्याच नाहीत़. मैत्रिणींच्यात मिसळायला त्यांना वेळच नव्हता़. आपल्या परीने घरकामात मदत करुन झाली की शेषाबाई देवासमोर बसत़. पूजेची तयारी करीत़. स्तोत्रपाठ, श्लोक पठण, जप वगैरे सतत चालू असे़. त्यांनी कधी कोणताही हट्ट केला नाही़. साधे कपडे पण नीट नेटकेपणा तेव्हांपासून आजही त्यांच्या ठिकाणी पहायला मिळतो़.

प पू ताईमहाराजांनी प पू श्री धुंडिराजमहाराजांकडून देऊळगांवराजा येथे १९५८ साली मंत्र घेतला़. आणि तेव्हां पासून त्यांच्या जपास प्रारंभ झाला़. प पू श्री धुंडिराजमहाराज त्यानंतर जेव्हां जेव्हां जालन्यात येत तेव्हा प पू ताईमहाराजांच्या घरी येत असत़. १९७८साली प पू श्रीधुंडिराजमहाराजांच्या समाधीनंतर प पू ताईमहाराज, प पू श्रीदत्तमहाराजांच्या संपर्कात आल्या़. जेव्हां जेव्हां हिंगोली, देऊळगांव अशा जवळच्या गांवी प पू श्रीदत्तमहाराजांचे आगमन होत असे तेव्हां तेव्हां ते प पू सौ ताईमहाराजांच्या घरी येत असत़. या बद्दल प पू सौ ताईमहाराजांनी त्यांच्या भावना खालील शब्दांत व्यक्त केल्या आहेत़.

प पू श्रीधुंडिराजमहाराज म्हणाले होते की ‘‘आम्ही तुमच्याकडे येत राहू़.‘‘ महाराजांचे महानिर्वाण झाल्यावर वाटले आता संपले़. पण सत्पुरुष आपल्या वचनाला जागतात़. त्यांची वचने आणि त्यांचे अस्तित्व त्रिकालाबाधित असते़. ते जसे म्हणाले तसे आज सद्गुरु दत्तमहाराजांच्या रुपाने येत राहिले आहेत़, येत राहातील़. ते आणि प पू श्रीदत्तमहाराज एकच आहेत याबद्दल यत्विंâचितही मनी संदेह नाही़. प पू श्रीदत्तमहाराज त्यांचा उल्लेख ‘‘साक्षात भगवती‘‘ असाच करीत असत़.

पुढे प पू सौ ताईमहाराजांनी जालन्याला एक छोटेसे मंदीर बांधले़. मंदीरात देवतास्थानी त्यांचे गुरु प पू श्री धुंडीराजमहाराज कवीश्वर आणि त्यांचे वडील प पू श्री काजळकर महाराज़. मंदीरात येणारी आणि स्वत: प पू ताईमहाराजांच्या तपाने आकर्षित होऊन त्यांच्या दर्शनाकरिता येणारी जनसंख्या हळू हळू वाढतच गेली़.

प पू श्री धुंडीराजमहाराजांच्या महानिर्वाणानंतर प पू ताईमहाराजांनी श्री धुंडीराज महाराजांचे सुपुत्र प पू श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांनाच गुरुस्थानी मानले़ प पू श्रीदत्तमहाराजही प पू ताईमहाराजांचे अलौकिक तप सामथ्र्य ओळखून होते़. जेव्हां प पू श्रीदत्त महाराज जालन्याच्या आश्रमात येत तेव्हां जणू कुठल्या नवचेतनेने सारा आश्रम जागृत होत असे़. तेथील उत्सवानाणि या दोन अलौकिक अशा संतांच्या वास्तव्याने उत्साहाची निर्मिती आपोपआप होत असे़. प पू ताईमहाराजांनी प पू दत्तमहाराजांचे श्रद्धाभावाने दर्शन ध्यावे आणि प पू महाराजांनी त्यांना ‘‘साक्षात भगवती‘‘ असल्याचा मान द्यावा़. अनेक साधकांना श्री दत्तमहाराजांनी गुरुमंत्र दिला़. पुढे प पू ताई महाराजांच्या सूचनेनुसार आणि महा तपोबलाने नवीन मंदीराची रचना याच पावनभूमित होऊ लागली़.

‘‘इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी ”

जालन्याच्या छोट््याशा मंदीराचे रुपांत बघता बघता भव्य अशा ‘‘श्रीदत्ताश्रम‘‘ या स्थानात झाले़.

आधुनिक काळात प्रसिद्धी मिळवून लोक संग्रह करण्याकरता केले जाणारे कोणतेही प्रयास न करता आजपर्यंत भगवतींच्या दिव्य शक्तीचा किर्ती सुगंध सतत दूर दूरवर पसरत चालला असल्यामुळे निरनिराळया क्षेत्रातले अनेक मान्यवर श्रीदत्ताश्रमात येऊ लागले आहेत़. शिर्डीजवळच्या साकोरी येथील प पू गोदावरी माता, करवीरपीठाचे श्री विद्याशंकर भारती, श्री किशोरजी व्यास, श्रीश्री रवी शंकर, आदि शंकराचार्यांच्या बद्रीपीठाच्या परंपरेतील विद्यमान श्रीविद्याभिनव श्रीकृष्णानंदतीर्थ आणि धारवाड येथील पंडितरत्न श्रीराजेश्वर शास्त्री अशी अनेक नांवे घेता येतील़.

संत होऊनच संतांना ओळखतात असे म्हणतात़ या न्यायाने भगवतींच्या अंतरंगाचा ठाव घेणे किती कठिण आहे याची आपल्याला कल्पना आहेच तरीही भक्तांना आपल्या प्रिय दैवताबददल जिज्ञासा असते आणि त्याला जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो़. भक्तांना आलेले भगवतींच्या कृपेचे अनुभव डॉ माधुरी पणशीकर संपादित ’’आल्हादिनी भाग १,२ व ३’’ मध्ये दिले आहेत़. त्यातून भगवतींच्या व्यक्तीमत्वाच्य पैलूंचे कवडसे पहायला मिळतात़.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.