मेनू बंद

परिसर

श्री दत्त पादुका मंदिर


श्रीदत्ताश्रमात प्रवेश केल्यानंतर नगारखान्याच्या उजव्या बाजूला पादुका मंदिराची वास्तू आहे़. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे़. मध्यभागी मुख्य दरवाजा व दोन्ही बाजूस लहान दरवाजे अशी प्रवेशाची व्यवस्था आहे़. मंदिरात प्रवेश केल्यानंतर जवळ जवळ ३०० माणसे बसू शकतील असा हॉल असून त्यापुढे मुख्य मंदिर आहे़. मुख्य मंदिराची रचना मोठी वैशिष्ट््यपूर्ण आहे़. श्रीनृसिंहवाडी येथील औदुंबर वृक्षाखालील श्री मनोहर पादुकांप्रमाणेच येथेसुद्धा औदुंबर वृक्षतळाशी श्रीदत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांची प्राणप्रतिष्ठा गुरुव्दादशी, दिनांक २५ ऑक्टोबर २००८ रोजी करण्यात आली़. पादुकांच्या पाठीमागे चांदीच्या प्रभावळीवर केलेली कलाकुसर नयनरम्य आहे़. याच मंदिरात पादुकांच्या डाव्या हाताला श्रीजगदंबेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़.

पादुकांच्या सभोवतालीचा दर्शनी भाग कांचेचा असून पादुका, श्रीजगदंबा व औदुंबर वृक्ष या भोवती प्रदक्षिणा मार्ग आहे़. प्रदक्षिणा मार्गावरील छताचा भाग विविध चित्रांनी सुशोभित केला आहे़. पादुकांच्या वरील कळसाचा कांही भाग कांचेचा असून सकाळी व संध्याकाळी त्यातून येणा-या सूर्य प्रकाशात पादुकांचे विहंगम दृष्य पहाता येते़. या मंदिराला उत्तरेच्या बाजूकडूनही प्रदक्षिणा मार्गावर प्रवेश व्दार आहे़. रोज सकाळी ठराविक वेळेत सोवळे नेसून पुरुषांना पादुकांवर पाणी घालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़. श्रावणात आश्रमाच्या पुजा-यामार्फत श्रीउमामहेश्वरावर संकल्पपूर्वक अभिषेक करता येतो़.

पादुकांची उपासना पद्धतीदेखिल श्रीनृसिंहवाडी येथील परंपरेनुसारच आहे़. रोज सकाळी व संध्याकाळी पूजा व आरती असा कार्यकम असतो़. श्रावणात महादेवावर अभिषेक करता येतो़.

श्री संतधाम 

श्रीदत्ताश्रमात प्रवेश केल्यानंतर नगारखान्याच्या उजव्या बाजूकडून जाणारी ओवरी संतधामच्या दिशेने जाते़. श्रीदत्ताश्रमाच्या प्रांगणात संतधाम उजवीकडे आहे़. या मंदिरात एक प्रमुख व त्याच्या दोहो बाजूस एक याप्रमाणे तीन गाभारे आहेत़. प्रमुख गाभा-यात श्रीरामचंद्र, प पू श्री काजळकरमहाराज, श्रीदत्तप्रभु व प पू श्री धुंडिराजमहाराज प्रतिमारुपाने विराजमान आहेत़. मुख्य गाभा-याच्या उजवीकडील गाभा-यात श्री योगेश्वरी देवीची प्रतिमा आहे़.

प पू ताईमहाराजांच्या संकल्पाने कार्तिक पौर्णिमा इ स २००७ पासून लक्षचंडी अनुष्ठानाचा एक भाग म्हणून आयुत चंडी (१०,०००) पाठांना आरंभ झाला़. त्या नंतर दर वर्षी कार्तिकी पौर्णिमेपासून माघी पौर्णिमेपर्र्यंत आयुतचंडी पाठ होऊन त्यांचे हवन होते़.

श्रीपादुकामंदिराप्रमाणेच श्रीसंतधाममध्ये साधारण ३०० माणसे एका वेळी बसू शकतील अशी व्यवस्था आहे़. श्रीदत्ताश्रमातर्फे साजरे केले जाणारे उत्सव या मंदिरात संपन्न होतात़. सांघिक धून, प्रवचन वगैरे नैमित्तिक सामुदायिक कार्य रकमदेखिल याच मंदिरात होतात़.

संतधामखाली असणा-या तळघराला श्रीप्रभुधाम हे नांव देण्यात आले आहे़. रोजच्या कोलाहलापासून दूर शांततेमध्ये पारायण, नामजप, साधनाभ्यास इ वैयक्तिक स्वरुपाच्या साधना विश्वस्तांच्या संमतीने करण्यासाठी येथे व्यवस्था आहे़.

श्री राघवालय

श्रीदत्ताश्रमाच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर समोरच राघवालय आहे़. या मंदिराचे छत दिसायला कौलारु छतांप्रमाणे दिसत असले तरीही प्रत्यक्षात मात्र हे आर सी सी बांधकाम आहे़. राघवालयात श्रीराम परिवारातील श्रीराम, श्रीसीता, श्री लक्ष्मण व श्री हनुमान यांच्या संगमरवरी मूर्र्तीं आहेत़. या मूर्ती प पू सौ ताईमहाराजांच्या सूचनांनुसार व शास्त्राधारे जयपूर येथील मूर्तीकारांकडून तयार करुन घेण्यात आल्या आहेत़ वेगवेगळया पोशाखातील श्रीराम परिवार मूर्र्ती फारच मनोहर दिसतात़. श्रीगुरुव्दादशी २००८ रोजी या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़. प्राणप्रतिष्ठेकरता दक्षिणेतून ब्र्राम्हण आले होते़. या मूर्तींची पहाटे काकड््यापूर्वी पूजा व आरती होते़. तसेच सायंकालीन आरती ६:४५ वाजता होते़.

गाभा-याच्या सभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे़. श्रीराम नवमी उत्सवापूर्वी सात दिवस या मंदिरात अखंड नामसप्ताह संपन्न होतो़. या मंदिराचा दर्शनी भाग श्रीदत्ताश्रमातील विशेष कार्यकमांना व्यासपीठ म्हणून उपयोगात आणला जातो़.

श्री अभिरामेश्वर

२०११ सालच्या शिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात पंडितरत्न वे़. शा़. सं. श्री राजेश्वरशास्त्री उप्पेनबेटगिरी यांच्या हस्ते श्री शिवलिंगाची स्थापना झाली़. त्यांनीच हे शिवलिंग कर्नाटकातील त्यांच्या जाणकार मूर्तीकाराकडून शास्त्रीय पद्धतीने तयार करुन घेऊन इथे आणले़.

यज्ञशाळा

श्रीदत्ताश्रमातील मुख्य प्रांगणाच्या उत्तरेला यज्ञशाळा बांधण्यात आली आहे़. यज्ञशाळेला १२ खांब आहेत़ प्रत्येक खांबांला शास्त्रानुसार रंग देण्यात आला आहे़. पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर अशा चार दिशांना प्रवेश व्दारे आहेत़. येथे पांच यज्ञकुंडे आहेत़. हवनातून तयार होणा-या धूमाचे विसर्जन होण्याकरता छताची विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आली आहे़.

श्रीदत्ताश्रमात प्रतिवार्षिक शतचंडी याग व आयुत चंडी याग याच यज्ञ शाळेत संपन्न होतात़. यागां दरम्यान एक वा पांचही यज्ञकुंडात हवन करण्यात येते़. यात ५० हून अधिक वैदिक यज्ञवेदीवर विविध शास्त्रोपचार करतात़.

गोशाळा

यज्ञशाळेच्या पश्चिमेला श्रीशिवालय असून त्याच्या पाठीमागे विस्तृत गोशाळा आहे़ श्रीदत्ताश्रमाच्या धार्मिक उददीष्टांना अनुसरुन गोसेवा केली जाते़. सध्या (२०११) आश्रमाच्या गोशाळेत सुमारे ५० गायी आहेत़. गायीच्या दूधाचा उपयोग अभिषेकाकरता व अगदी दुधावर राहाणा-या लहान मुलांकरता केला जातो़. गायीच्या शेणाचा उपयोग स्वयंपाक घरातील चूली व यज्ञशाळा सारवण्यासाठी तसेच आश्रमाची बाग व शेत येथे खत म्हणून केला जातो़.

उद्यान

देवपूजेकरता लागणा-या पुâलांची लागवड मणिव्दीप वाटीकेत केलेली आहे़. या वाटीकेत काकडा, जास्वंद, गुलाब, झेंडू, मोगरा, चाफा, इ ४० प्रकारच्या पुâलांची रोपे आहेत़. त्याशिवाय तुळस व बेलाचीही झाडे आहेत़. त्याचप्रमाणे आश्रमाकरता लागणारा भाजीपालाही येथे पिकवला जातो़.

दिनचर्या

मुख्य हरि कथा निरुपण ।

कलियुगामध्ये सर्व संत मंडळींनी हरि नामस्मरण हा अत्यंत सोपा आणि सरळ मार्ग अध्यात्म प्राप्तीसाठी सांगितला आहे़. नामस्मरणाने केवळ स्मरण करणा-याचेच कल्याण होते असे नसून संपूर्ण परिसराची शुद्धि होते़. याचा अनुभव श्रीदत्ताश्रमामध्ये येणा-या प्रत्येकाला येतो़. श्रीदत्ताश्रमामध्ये सर्व सामान्यांना उपासना म्हणून प पू ताईमहाराज सतत नामस्मरणाचा आग्रह धरतात आणि प्रत्येकाला त्याच्या आवडेल त्या मार्गाने नामस्मरणाला लावतात़. इथे दिनचर्येमध्ये पहाटे पांच वाजल्यापासून देवाच्या काकडारतीच्या रुपाने नामस्मरणाची सुरवात होते़. आधी पुरुष मंडळींचा काकडा होऊन सकाळी ६ च्या सुमारास स्त्रियांचा काकडा सुरु होतो़. उत्सवात आणि कांही विशेष प्रसंगी मंदिरातून प्रभात फेरी निघते़. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात सर्व भक्त मंंडळी देवदर्शन घेऊन पूर्ण दत्ताश्रमास प्रदक्षिणा घालतात़. पुढे दिवसभर येणारी भक्त मंडळी देवापाशी बसून जमेल तेवढा जप करतात़. इथे येणा-या प्रत्येकाने आपला जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये घालवावा अशी प पू ताईमहाराजांची स्पष्ट सूचना आहे़. सायंकाळी ४़३० वाजता श्रीदत्तनामसंकिर्तन व पंचपदीचा कार्यकम असतो़. सायंकाळी ६़४५ वाजता श्रीराघवालयातून आरती सुरु होते जी पुढे संतधाम आणि पादुका मंदिर करुन श्री अभिरामेश्वर मंदिरात संपते़. त्या नंतर स्थानिक भक्तगणांंतर्फे त्रिपदी होते़.

दर गुरुवारी रात्री ९ ते ९। दरम्यान सुरु होणारी आरती ११ पर्यंत चालते़. आठवड््यातील प्रत्येक शनिवारी रात्री १० वा ‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा‘‘ ही धून सुरु होऊन पहाटे पांच वाजता सुरु होणा-या काकडारतीपर्यंत चालते़.

आश्रमाच्या दिनदर्शिकेत दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका रविवारी धून – नामस्मरणाचा सामुहिक कार्य ्रकम करण्यात येतो़.

कांही विशिष्ट वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने अखंड नामसप्ताह केला जातो़. नामस्मरण श्रीदत्ताश्रमाचे मुख्य वैशिष्ट््य आहे़.

श्रीदत्ताश्रमातर्फे पुरवल्या जाणा-या सुविधा

परगांवाहून आलेल्या भक्तांना इथे उतरण्याची व राहाण्याची उत्तम सोय आहे़. अर्थात कोणालाही स्वतंत्र खोली दिली जात नाही़. पण चटई, पांघरुण, स्नानादि करता गरम पाण्याची व्यवस्था केली आहे़. स्नानाकरता सौर ऊर्जेने गरम पाण्याची व्यवस्था केली गेली आहे़. निवास, चहा, नाश्ता व प्रसाद भोजनाकरता कोणताही आकार घेतला जात नाही पण स्वेच्छेने दिलेली देणगी स्वीकारली जाते़.

याच इमारतीत तळमजल्यावर आश्रमाचे नवीन ऑफिस सुरु झाले आहे़.

 

आश्रमातर्फे विकासाचे निरनिराळे उप ्रकम हाती घेण्यात येत आहेत़. उदा़. बायोगॅस प्रकल्प़. तसेच दिवसें दिवस येणा-या भक्तांची संख्या वेगाने वाढत असल्याने सध्याच्या स्वैपाकघरातली व्यवस्था अपुरी पडू लागली आहे म्हणून एक विशाल व अत्याधुनिक यांत्रिकीकरणाने सुसज्ज असे भांंडार गृह, स्वैपाक घर आणि भोजन कक्ष बांधण्याची योजना आहे़.

श्रीदत्ताश्रमातर्पेâ प्रकाशित झालेले व सध्या उपलब्ध असलेले साहित्य व त्याचा थोडक्यात परिचय

 1. श्रीदत्तविचारशलाका – प पू श्रीदत्तमहाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त केलेले उपदेशपर विचार संक्षिप्त रुपाने या पुस्तकात वाचायला मिळातात़.
 2. आल्हादिनी भाग १ व २ – (प पू सौ ताईमहाराज चाटुपळे यांच्या भक्तांच्या अनुभवांचा संग्रह़) अनेक साधकांचे अनुभव या दोन्ही भागात एकत्र मांडले आहेत़. एकीकडे त्यांच्या दिव्य शक्तीचा अधिकार तर दुसरीकडे अनेकांना त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, आयुष्यात कसे वागावे, ध्येय काय असावे याची साधकांना करुन दिलेली जाणीव या दोन्हींचा सुरेख संगम या पुस्तकातून घडला आहे़. त्यांच्या व्रतस्थ आणि निस्पृह जीवनाचा एक सुंदर आलेख यातून आपोआप उलगडला आहे़.
 3. प पू श्री दत्तमहाराज कवीश्वर यांचा पत्र संग्रह भाग १ व २ (प पू श्रीमहाराज व त्यांचे भक्त यांच्यातील पत्र व्यवहारावर आधारीत प्रकाशन) – यात पत्रांच्या माध्यमातून श्रीमहाराजांनी साधकांना मार्गदर्शन केले आहे़. प्रतिकूलतेवर ईश्वरभक्तीने मात करता येते, संसार देवाचा आहे, तो कर्तव्याला न चुकता करुन देवाच्या चरणी वाहून टाकावा, प्रयत्नवाद असावा, नामस्मरण, संतचरित्राचे वाचन, नियमित साधना करणं अशा विविधांगी आणि परमार्थ प्रवण करणा-या महत्वाच्या सूचना यात दिल्या आहेत़.
 4. पत्रसंग्रह २ मध्ये शेवटी सर्वसामान्य वाचकाला समजतील अशा त-हेने प्रश्न मांडून त्याची उत्तरे महाराजांच्या प्रवचनांतून घेतली आहेत़.
 5. व्दिसाहस्त्री श्रीगुरुचरित्र सटीक – मूळ प्राकृतातील श्रीगुरुचरित्रामध्ये सात हजार ओव्या आहेत़. प प श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेने हा कथाभाग दोन हजार श्लोकात संस्कृत भाषेत सांगितला असल्याने याला व्दिसाहस्त्री असे नांव दिले आहे़. मूळ श्रीगुरुचरित्रातील कथाभागाशिवाय श्रीस्वामीमहाराजांनी या ग्रंथातल्या श्लोकावर संस्कृत भाषेतच विवरण (ज्याला संस्कृत भाषेत टीका म्हणतात) लिहिले आहे़.
 6. श्री महाराजांनी मराठी भाषेत या ग्रंथावर आधारीत विवरणात एरव्ही सर्व सामान्यांना न समजणारे शास्त्रीय सिद्धांत, शास्त्रीय माहीती, त्याचे महत्व सोप्या भाषेत दिल्याने ते सामान्य वाचकभक्ताला शास्त्राचरण करण्यास उद्युक्त करते़.
 7. व्दिसाहस्त्री श्रीगुरुचरित्र – श्रीगुरुचरित्रातील कथांचा गूढार्थ ह्यातून सांगितला आहे़. दृढ, श्रद्धा, भक्ती, समर्पण कसे असते हे निरनिराळया कथांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सांगितले आहे़. बुद्धि शुद्धता, कर्र्म शुद्धि, मनाची स्थिरता, सात्विक आहार ह्याचेही विवेचन या भागांतून केले आहे़.
 8. आनंदलहरी भाग १ते ८ – भगवंताचे अनेक गुण व त्याची शक्ती, त्या विषयीची भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, दृढ व्हावी या विषयीचे चिंतन या सर्व भागातून आले आहे़. गायत्री मंत्र, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ, अपराधक्षमापन स्तोत्र या सर्वांचे रहस्य व अर्थ उलगडून दाखवला आहे़. उपासनामार्ग, कर्म, ज्ञान, भक्ती, मोक्ष या विषयीचे सखोल चिंतन संतांच्या चरित्रातून, महाभारत, रामायणासारख्या ग्रंथातून वर्णन केलेल्या प्रसंगानुसार त्या त्या व्यक्तीचे दाखले देत केले आहे़. सद्गुणांचा विकास व अवगुणांचा त्याग हा या प्रवचनांतील एक हेतु पण ज्या साधकांना ज्ञानाच्या खोल समुद्रात सूर मारायचा असेल तर त्यांनी ही प्रवचने मूळातूनच वाचावी़.
 9. जिज्ञासापूर्ती भाग १ व २ – प्रपंच आणि परमार्थ साधताना जीवाची उडालेली तारांबळ, ईश्वरभक्ती, सद्गुरुंची शक्ती, साधनेतील व्यत्यय, आहार विहार या संदर्भातील कुतूहल आणि प्रश्न साधकांच्या मनांत असतात़. मनाचे पूर्ण समाधान करणारे विवेचन यांत आपणाला वाचायला मिळेल़.
 10. श्रीदेवी भागवत भाग २ व ३ – प पू श्रीमहाराजांची प्रस्तुत पुस्तकातली प्रवचने म्हणजे मूळ संस्कृत भाषेतील पारंपारिक श्रीदेवीभागवत या ग्रंथावर आधारीत नवरात्रीच्या निमित्ताने केलेले रसाळ आणि भावपूर्ण असे प्रगट चिंतन आहे़. श्रीदेवीभागवताची चौकट न सोडता त्यांनी साधकांच्या अध्यात्मिक जाणीवा विकसित व्हाव्या म्हणून निरनिराळे शास्त्रीय विचार मांडले आहेत़.
 11. प पू श्रीदत्तमहाराजांच्या गोष्टी – प पू श्रीमहाराजांच्या आठवणी गोष्टीरुपाने सांगितल्या आहेत़. विशेषत: लहान मुलांनी मनावर योग्य ते संस्कार घडवणारे हे पुस्तक आवर्जुन वाचावे़. महाराजांची व्यावहारिक दक्षता, अभ्यास, प्रयत्न, कष्ट करण्यावर दिलेला भर, ईश्वरस्मरण, उपासना याची विद्यार्थी जीवनांत असणारी आवश्यकता या सर्वांचा योग्य निवाडा महाराजांच्या जीवनांतील कांही प्रसंगावरुन होतो.
 12. कल्याणवचने – प पू श्रीमहाराजांच्या प्रवचनांतून घेतलेले संक्षिप्त विचार या पुस्तकात बोधवचनांच्या स्वरुपात मांडले आहेत़. हे त्यांचे ‘‘आत्मानुभवाचे बोल‘‘ आहेत़. रोज एक विचार मनांत ठेवून त्याचे चिंतन केले तर इह व पर दोन्हीकडचे कल्याण साधता येईल़.
 13. श्रीसुंदरदत्तचरितम् – प पू श्रीदत्तमहाराजांचे ओवीबद्ध चरित्र
 14. श्रीमत् भागवत – प पू श्रीदत्तमहाराजांचे मूळ ग्रंथावर रसाळ प्रासादिक भाषेत निरुपण़.

 

श्रीदत्ताश्रमात येणा-या भक्तांकडून अपेक्षा

हा आश्रम आहे़. इतरत्र न मिळणारी शांती इथे मिळावी आणि आलेल्या भक्तांकडून जास्तीत जास्त उपासना व्हावी म्हणून उपर्निदीष्ट सुखसोयी पुरवल्या जातात़. तेव्हां या परिसरात आल्यानंतर अनावश्यक गप्पा गोष्टी, चौकशा करण्यात वेळ न घालवता इथल्या दैनंदिन कार्यक्रमात सहभागी व्हावे व आपली उपासना करुन मन:शांती, समाधान प्राप्त करुन घ्यावे एवढीच माफक अपेक्षा आलेल्या भक्तांकडून आहे़.

शक्यतो इथे येण्यापूर्वी परिचित भक्तांनी ते इथे कधी येणार, बरोबर किती मंंडळी असतील वगैरे ऑफिसात फोन करुन कळवावे़.

कार्यालयात नोंद (येण्याची व जाण्याची) करावी़.

दैनंदिन कार्यक्रमात सहभाग घ्यावा़.

नाश्ता व जेवणाची वेळ पाळावी़.

आश्रमातील सर्व दैनंदिन कामे सेवाभावाने सेवेकरता येणा-या स्थानिक व परगांवाहून येऊन राहिलेल्या भक्तांकडून केली जातात़.