मेनू बंद

त्सव

श्रीदत्ताश्रमातील उत्सव

 1. श्रीगुरुपौर्णिमा
 2. श्रीदत्तजयंती
 3. श्रीराम नवमी
 4. श्रीगुरुव्दादशी
 5. प पू श्रीदत्तमहाराजांचे पुण्यस्मरण

इतर उत्सव:

 1. श्रीगुरुप्रतिपदा
 2. प पू श्रीदत्तमहाराजांचा वर्धापन दिन
 3. प पू श्री काजळकरमहाराजांची पुण्यतिथी
 4. प प श्रीशंकराचार्य जयंती
 5. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज पुण्यतिथी
 6. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज जयंती
 7. श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज जयंती
 8. गोकुळाष्टमी
 9. श्रीगणेश चतुर्थी – श्रीपादश्रीवल्लभ जयंती
 10. त्रिपुरी पौर्णिमा

मुख्य उत्सवात रोज अन्नदान होते़ इथे अन्नदान करताना प पू ताईमहाराजांची अशी भावना आहे की इथे अन्नग्रहण करणा-या प्रत्येकाच्या मुखाने प्रत्यक्ष ईश्वरच अन्नग्रहण करीत असतो़. आजूबाजूच्या गांवातील लोकांना कोणताही भेदभाव न करता पोटभर जेवण दिले जाते़.

त्या शिवाय आश्रमात पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे प पू श्रीदत्तमहाराजांच्या पुण्यस्मरणाच्या आधी ३ दिवसांचा चंडी याग केला जातो़.

या धार्मिक कार्याकरता महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र वगैरे प्रांतातूनही विव्दान ब्राम्हण येतात़.

‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा‘‘ या प प श्रीमव्दासुदेवानंद सरस्वतींनी प्रगट केलेल्या महामंत्राचा रोज ठराविक वेळात सामुदायिक जप केला जातो़. त्या शिवाय विशिष्ट उत्सवाच्या पूर्वी या महामंत्राचा अखंड जप होतो़. ‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा‘‘ या प प श्रीमव्दासुदेवानंद सरस्वतींनी प्रगट केलेल्या महामंत्राचा १८ कोटी जप संकल्पपूर्वक पूर्ण झालेला आहे़.

श्रीराम जय राम जय जय राम या नाममंत्राचा श्रीराम नवमी उत्सवानिमित्त अखंड जप केला जातो़. त्या व्यतिरिक्त प पू ताईमहाराजांनी १३ कोटी श्रीरामनामाचा संकल्प केला असून त्यांच्या आज्ञेने २०१० सालच्या श्रीराम नवमीपासून श्रीदत्ताश्रमात येणा-या भक्तांनी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप आरंभ केला आहे़.