मेनू बंद

|| प पू ताईमहाराजांचा संक्षिप्त परिचय ||

प पू ताईमहाराजांचा जन्म १९४० सालच्या श्रीराम नवमीला जालन्यात झाला़. वडिल प पू श्री काजळकरमहाराज उर्फ अण्णा त्यांच्या या शशिकलेला प्रेमाने “शशाबाई” अशी हांक मारीत़. जन्मानंतर कांही महिन्यांनी अण्णांनी छोट्या शशाबाईना देऊळगांवराजाला नेले आणि प पू श्री धुंडिराजमहाराजांच्या मांडीवर ठेवून त्यांनी प्रार्थना केली, “महाराज, ही आपली मुलगी आहे़ आपण हिचा सांभाळ करा़.’’ त्या दिवसापासून श्रीधुंडिराजमहाराज व थोरल्या आईसाहेबांनी शशाची जबाबदारी स्वीकारली़. सुरवातीची ७-८ वर्ष शेषा श्री धुंडिराजमहाराजांच्या कृपाछत्राखाली राहिली आणि तिथेच शशाबाईवर भक्तीमार्गाचे, अध्यात्मविद्येचे दृढ संस्कार झाले़. पुढे शशाबाई मामा मामींच्याकडे जालन्यात राहिली़. त्या कधी लहानपणी बालसुलभ खेळ खेळल्याच नाहीत़. मैत्रिणींच्यात मिसळायला त्यांना वेळच नव्हता़. आपल्या परीने घरकामात मदत करुन झाली की शेषाबाई देवासमोर बसत़. पूजेची तयारी करीत़. स्तोत्रपाठ, श्लोक पठण, जप वगैरे सतत चालू असे़. त्यांनी कधी कोणताही हट्ट केला नाही़. साधे कपडे पण नीट नेटकेपणा तेव्हांपासून आजही त्यांच्या ठिकाणी पहायला मिळतो़.

प पू ताईमहाराजांनी प पू श्री धुंडिराजमहाराजांकडून देऊळगांवराजा येथे १९५८ साली मंत्र घेतला़. आणि तेव्हां पासून त्यांच्या जपास प्रारंभ झाला़. प पू श्री धुंडिराजमहाराज त्यानंतर जेव्हां जेव्हां जालन्यात येत तेव्हा प पू ताईमहाराजांच्या घरी येत असत़. १९७८साली प पू श्रीधुंडिराजमहाराजांच्या समाधीनंतर प पू ताईमहाराज, प पू श्रीदत्तमहाराजांच्या संपर्कात आल्या़. जेव्हां जेव्हां हिंगोली, देऊळगांव अशा जवळच्या गांवी प पू श्रीदत्तमहाराजांचे आगमन होत असे तेव्हां तेव्हां ते प पू सौ ताईमहाराजांच्या घरी येत असत़. या बद्दल प पू सौ ताईमहाराजांनी त्यांच्या भावना खालील शब्दांत व्यक्त केल्या आहेत़.

प पू श्रीधुंडिराजमहाराज म्हणाले होते की ‘‘आम्ही तुमच्याकडे येत राहू़.‘‘ महाराजांचे महानिर्वाण झाल्यावर वाटले आता संपले़. पण सत्पुरुष आपल्या वचनाला जागतात़. त्यांची वचने आणि त्यांचे अस्तित्व त्रिकालाबाधित असते़. ते जसे म्हणाले तसे आज सद्गुरु दत्तमहाराजांच्या रुपाने येत राहिले आहेत़, येत राहातील़. ते आणि प पू श्रीदत्तमहाराज एकच आहेत याबद्दल यत्विंâचितही मनी संदेह नाही़. प पू श्रीदत्तमहाराज त्यांचा उल्लेख ‘‘साक्षात भगवती‘‘ असाच करीत असत़.

पुढे प पू सौ ताईमहाराजांनी जालन्याला एक छोटेसे मंदीर बांधले़. मंदीरात देवतास्थानी त्यांचे गुरु प पू श्री धुंडीराजमहाराज कवीश्वर आणि त्यांचे वडील प पू श्री काजळकर महाराज़. मंदीरात येणारी आणि स्वत: प पू ताईमहाराजांच्या तपाने आकर्षित होऊन त्यांच्या दर्शनाकरिता येणारी जनसंख्या हळू हळू वाढतच गेली़.

प पू श्री धुंडीराजमहाराजांच्या महानिर्वाणानंतर प पू ताईमहाराजांनी श्री धुंडीराज महाराजांचे सुपुत्र प पू श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांनाच गुरुस्थानी मानले़ प पू श्रीदत्तमहाराजही प पू ताईमहाराजांचे अलौकिक तप सामथ्र्य ओळखून होते़. जेव्हां प पू श्रीदत्त महाराज जालन्याच्या आश्रमात येत तेव्हां जणू कुठल्या नवचेतनेने सारा आश्रम जागृत होत असे़. तेथील उत्सवानाणि या दोन अलौकिक अशा संतांच्या वास्तव्याने उत्साहाची निर्मिती आपोपआप होत असे़. प पू ताईमहाराजांनी प पू दत्तमहाराजांचे श्रद्धाभावाने दर्शन ध्यावे आणि प पू महाराजांनी त्यांना ‘‘साक्षात भगवती‘‘ असल्याचा मान द्यावा़. अनेक साधकांना श्री दत्तमहाराजांनी गुरुमंत्र दिला़. पुढे प पू ताई महाराजांच्या सूचनेनुसार आणि महा तपोबलाने नवीन मंदीराची रचना याच पावनभूमित होऊ लागली़.

‘‘इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी ”

जालन्याच्या छोट््याशा मंदीराचे रुपांत बघता बघता भव्य अशा ‘‘श्रीदत्ताश्रम‘‘ या स्थानात झाले़.

आधुनिक काळात प्रसिद्धी मिळवून लोक संग्रह करण्याकरता केले जाणारे कोणतेही प्रयास न करता आजपर्यंत भगवतींच्या दिव्य शक्तीचा किर्ती सुगंध सतत दूर दूरवर पसरत चालला असल्यामुळे निरनिराळया क्षेत्रातले अनेक मान्यवर श्रीदत्ताश्रमात येऊ लागले आहेत़. शिर्डीजवळच्या साकोरी येथील प पू गोदावरी माता, करवीरपीठाचे श्री विद्याशंकर भारती, श्री किशोरजी व्यास, श्रीश्री रवी शंकर, आदि शंकराचार्यांच्या बद्रीपीठाच्या परंपरेतील विद्यमान श्रीविद्याभिनव श्रीकृष्णानंदतीर्थ आणि धारवाड येथील पंडितरत्न श्रीराजेश्वर शास्त्री अशी अनेक नांवे घेता येतील़.

संत होऊनच संतांना ओळखतात असे म्हणतात़ या न्यायाने भगवतींच्या अंतरंगाचा ठाव घेणे किती कठिण आहे याची आपल्याला कल्पना आहेच तरीही भक्तांना आपल्या प्रिय दैवताबददल जिज्ञासा असते आणि त्याला जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो़. भक्तांना आलेले भगवतींच्या कृपेचे अनुभव डॉ माधुरी पणशीकर संपादित ’’आल्हादिनी भाग १,२ व ३’’ मध्ये दिले आहेत़. त्यातून भगवतींच्या व्यक्तीमत्वाच्य पैलूंचे कवडसे पहायला मिळतात़.

प पू श्रीधुंडिराजमहाराज कवीश्वर 

  

चार पांच पिढ्यांपासून वैदिक प्राच्य संस्कृत विद्या, श्रौतस्मार्त यागानुष्ठान, मंत्र तंत्र शास्त्र, महाभारत, भागवत इत्यादिंवर प्रभुत्व असलेल्या, ईशसेवेत रममाण होणा-या व ईश्वरी कृपा असलेल्या पवित्र, ज्ञानी व थोर शास्त्री घराण्यात श्री धुंडिराज महाराजांचा जन्म झाला़. त्यांचे मूळ आडनांव दीक्षित पण त्यांच्या आजोबांनी नरसोबा वाडीला राहायला आल्यावर रोज ५ श्लोक रचून ती स्तुतिसुमने श्रीदत्ताच्या चरणी अर्पण करण्याचा परिपाठ ठेवला़. त्यांच्या उत्कृष्ट व प्रासादिक काव्यप्रतिभेवरुन लोक त्यांना कवीश्वर म्हणू लागले़.

त्यांच्या पत्नी सौ सरस्वतीबाईही धार्मिक आचरण व पूजा अर्चा, व्रत वैकल्ये, निरनिराळी अनुष्ठाने अखंड करीत असत़. त्या श्रीमहाराजांच्या कार्यात पूर्णपणे समरस झाल्या होत्या़ यांनी विदर्भातील सुलतानपूर येथे देह ठेवला़. त्यांचे तिथे समाधी मंदिर बांधले आहे़.

शिक्षण व उपासना

श्रीमहाराजांचे प्राथमिक शिक्षण वाडीत वडिलांजवळ आणि परंपरागत शिक्षण वाडीच्याच श्रीकृष्णाशास्त्री वष्ट यांच्या पाठशाळेत झाले़. पुढचे शिक्षण घेण्याकरता ते इंदोरला जाऊन राहिले होते़. वेद वेदांत, धर्म शास्त्र, काव्यालंकार, आणि न्यायशास्त्राचे त्यांनी उत्तम अध्ययन व पुढे अध्यापन केले़. त्यांनी आयुष्यभर श्रीगणेशाची, श्रीदत्तप्रभुंची व कुलस्वामीनी श्री रेणुकामातेची उपासना केली़. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांच्यावरही प प श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांची पूर्ण कृपा होती़.

गंगेप्रमाणे संतांचे मन निर्मळ असल्याने भगवंत नेहमीच त्यांच्या जवळ असतो़. स्वानंदाच्या भाग्याचे त्यांना दर्शन घडलेले असते़. मीठ एकदा पाण्यात पडले की पाण्याशी एकरुप होते पुन्हा निराळे बाहेर काढता येत नाही त्याप्रमाणे संतांची चित्तवृत्ती ब्रम्हात समरस झाली असल्याने पुन्हा मायाजालात येऊच शकत नाही़. संसारिक इच्छांची व आकांक्षांची तृप्ती म्हणजे समाधान असा आपला ऐहिक अर्थ आहे़. पण़ हे खरे शाश्वत समाधान नव्हे़. ’’समाधान’’ या शब्दातील ‘‘धा’’ या धातूचा मूळ अर्थ स्थिर असणे असा आहे़. सम + आ + धा म्हणजे शुद्ध ब्रम्हात सदैव जे स्थिर असते तेच खरे समाधाऩ. श्री महाराजांसारख्या प्रसन्न चेतस संताच्या निरागस मुखकमलावर या ख-या समाधानाचे रम्य स्वरुप पहावयास मिळते़. ईश्वरी अनुग्रह, ईशसेवा तप, अध्यात्मिक ज्ञान, ज्ञातेपणा न मिरवणारी लीनता, निरभिमान, निरपेक्षता, निर्लोभता, मौन, आर्जव, विनय, शुचिता, दया, इ अनंत गुणरत्नांची संत हे खाणच आहेत़. श्रीदासबोधातील सद्गुरु स्तवनांत संताचा महिमा वर्णि ाव सूर्य, सुवर्ण, गंगा, सागर, मेरु, गगन इ अनेक उपमेये कमीच पडतात असे दाखवून शेवटी श्री समर्थ म्हणतात.

अध्यात्मिक कार्य 

श्रीक्षेत्र नरसोबा वाडीतील वास्तव्यानंतर श्रीमहाराज विदर्भातील देऊळगांवराजा येथे राहाण्यास आले़. तिथे त्यांनी श्रीबालाजीमहाराजांची अखंड सेवा केली़. ते पुराण सांगत, प्रसंगाने प्रवचन करीत़. विदर्भ, मराठवाडा वगैरे भागात यांचे हजारो शिष्य झाले़ भक्तांच्याबद्दलचा त्यांचा लळा व जिव्हाळा विलक्षण होता़. त्यांच्याकडे समाजातील सर्व स्तरातील दु:खी, पीडीत लोक सतत येत आणि महाराजांनी सांगितलेल्या साध्या सोप्या उपायांनी दु:खमुक्त होत़. या निमित्ताने ते लोकांना ईशभक्तीकडे वळवत़. मंत्रशास्त्रज्ञ असल्याने दैवी संकटावर ते अचूक पण साधे उपाय सांगत़. सर्वांना ज्ञान, उपदेश, मार्गदर्शन व संकट निवारण करुन महाराजांनी असंख्य जीवांना उपकृत केले़. आजही अव्यक्तात राहून त्यांची जी शक्ती कार्य करते आहे या त्यांच्या ईश शक्तीचे व दैवी सामथ्र्याचे त्यांच्या भक्तांना आजही अनुभव येतात़. अखंड ईश्वर चिंतन, भक्ती करीत असल्याने आत्मज्ञान संपन्न व साक्षात्कारी असूनही त्यांच्या लीनता, विनम्रता, निगर्वी सरळ स्वभावामुळे त्यांच्याकडे आलेली व्यक्ती फार प्रभावित होत असे़.

स्वभाव वैशिष्टये परालंबित्व त्यांच्या स्वभावात नव्हते़. दुस-याला आपली सेवा ते सहसा करुन देत नसत़. दिलेला शब्द पाळण्यात ते अत्यंत दक्ष होते़. भक्तांकरता पडतील ते कष्ट करताना व त्यांना मुक्त हस्ताने कृपादान करताना महाराजांच्या वागण्यात कधी त्रागा विंâवा चिडचिड नसे़. परोपकार हा त्यांचा स्वभाव व भवरोग वैद्य हे त्यांचे जीवीतकार्य होते़. ते दीर्घायुषी होते व १९७८ साली वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी देऊळगांवराजा येथे देह ठेवला़. तिथे त्यांचे समाधीमंदिर असून त्यांची जयंती व पुण्यतिथी त्यांचे पिढीजात भक्त आजही फार मोठया प्रमाणावर साजरी करतात़. त्यांची कुलगुरुपरंपरा त्यांचे सुपुत्र श्रीदत्तमहाराजांनी पुढे चालू ठेवली़.

प पू श्री ज्ञानदेव दत्तात्रय काजळकरमहाराज 

श्री काजळकरमहाराजांचे मूळ नांव श्री दत्तात्रेय रावजी कुलकर्णी पण काजळ गांवात अनेक वर्ष राहिल्याने त्यांना लोक ‘‘काजळकर‘‘ या नांवाने ओळखू लागले़. गांव काजळ हे जालन्यापासून १२ किलोमीटरवर आहे़. या गांवात प्रेक्षणीय असे ’’श्रावणतळे’’ आहे़. दशरथ राजा संचार करीत इथे आला व श्रावणबाळाला शिकार समजून त्याने बाण मारल्याची घटना इथेच घडल्याची स्थानिक आख्यायिका आहे़.

काजळा गांवाचे ते कुलकर्णी म्हणून सरकारी काम पहात असत़. पुढे त्यांनी ही वतनदारी सोडून पोलीस खात्यात नोकरी धरली़. परंतु स्वभावत: अत्यंत प्रेमळ व कनवाळू असलेल्या महाराजांना पोलीस खात्यातली नोकरी मानवली नसावी म्हणून त्यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला़. आणि पुढे ते शाळेतील शिक्षक पदातून जगताच्या शाळेतले शिक्षक झाले़.

शिक्षण व उपासना

देऊळगांवराजा येथील विख्यात संत प पू श्री धुंडिराजमहाराज कवीश्वर यांच्याकडून अनुग्रह झाल्यावर त्यांनी आपल्या अध्यात्मिक साधनेस आरंभ केला़. श्रीमहाराजांनी तेरा कोटी श्रीरामनामाचा लेखी जप केल्यावर त्यांना श्रीरामाने सगुण दर्शन दिले़. तसेच श्रीगुरुचरित्राची असंख्य पारायणे झाल्यामुळे श्रीनृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांचाही सगुण साक्षात्कार झाला़. त्यांचा अधिकार जाणून त्यांच्या भक्तांनी त्यांना ’’ज्ञानदेव’’ ही पदवी बहाल केली़.

वैदिक धर्माबरोबर इस्लामचाही त्यांचा सखोल अभ्यास होता़. मराठी, हिंदी, संस्कृतप्रमाणेच त्यांचे अरबी व उर्दू भाषेवरही प्रभुत्व होते़. त्यांचे अनेक मुसलमान भक्त होते़. त्यांनी रमल विद्या आत्मसात केली होती़. कुराणाचा अभ्यासही केला होता़. श्री महाराजांनी अथक परिश्रम, कठोर उपासना करुन अत्युच्च अध्यात्मिक पातळी गांठली़. पूर्ण योगी झाले़. योगशास्त्रात सांगितलेल्या सर्व सिद्धी त्यांच्या दासी होत्या़. त्यांच्या सद्गुरुंनी म्हणजेच प पू श्री धुंडिराजमहाराजांनी स्वत: याची त्यांना पोच पावती दिली़. प्रसंगाने त्यांची ही शक्ती प्रगट होत असे़. एकदा लांबचे एक तबक घेण्याकरता त्यांनी त्यांचा हात सुमारे ८ ते १० पूâट लांब केलेला पाहिलेले लोक आहेत़. योगसामथ्र्याने विषारी नागासारखे हिंस्त्र प्राणीही त्यांचे अंकित होत असत़.

अध्यात्मिक कार्य 

बहुजन समाजात मिसळून त्यांचा उद्धार करायचा त्यांना ध्यास असल्याने त्यांनी आहारविहाराचे विधीनिषेध बाजूला ठेवले होते़. अर्थात हे करताना अभक्षभक्षण मात्र त्यांनी कधी केले नाही़. त्यांनी जातीभेद कधीच मानला नाही़. त्यामुळे समाजातल्या तळागाळातल्या भक्तांनाही ते आपले वाटत़. त्यांच्या परंपरेमध्ये प्रसाद म्हणून चहा दिला जात असे़.

जालन्याजवळच्या सवना गांवात महाराजांच्या भक्त मंडळींनी शेषशायी नारायणाचे मंदिर बांधायचे ठरवले़. जवळच्या शेतक-याला त्यांनी बांधकामाला त्याच्या विहीरीतून पाणी देण्याची विनंती केली़. पण त्याला काय अवदसा आठवली त्याने ठाम नकार दिला़. महाराजांनी भक्तांना विहीर खणण्यास सांगितले़. तिला जेव्हां प्रथम पाणी लागले नाही तेव्हां महाराजांच्या कृपेने ती विहीर पाण्याने भरली़. ती आजही पहायला मिळते़.

मृत्युवरही त्यांनी जय मिळवला होता़. नियतीच्या नियमाप्रमाणे त्यांचा मृृत्यु आधी आला होता पण त्यांनी त्यांच्या इच्छेने १९७४ च्या चैत्र शुद्ध व्दितीयेला नांदेड येथे प पू सौ ताईमहाराजांच्या घरी देह ठेवला़.

भौतिक देहाचा त्याग केला तरी त्यांच्या भक्तांना एवढेच काय पण ज्यांनी त्यांना कधीही प्रत्यक्ष पाहिले नव्हते अशा आजच्या पिढीतल्या भक्तांनासुद्धा त्यांचे अद्यापि जागृतावस्थेत विंâवा स्वप्नावस्थेत दर्शन होते आहे़.

प पू श्रीदत्तमहाराज कवीश्वर 

कवीश्वर घराणे: ब्रम्हर्षी, प पू श्रीदत्तात्रेय धुंडिराज कवीश्वर यांचे मूळ घराणे नगर जिल्ह्यातल्या मांडवगडचे़. पुढे श्रीमहाराजांचे आजोबा प पू श्री वक्रतुंडमहाराज व पिताजी प पू श्रीधुंडिराज महाराजांचे श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे दीर्घ काळ वास्तव्य झाल्याने श्री महाराजांचा जन्म वाडी येथे २ मार्च १९१० रोजी झाला़ श्री महाराजांचे बालपणही वाडीतच गेले़. परंपरागत पद्धतीने त्यांचे शिक्षण झाले़. वेद, वेदांत, धर्मशास्त्र, काव्य, न्यायशास्त्रासारख्या गहन विषयांचे त्यांना पूर्ण ज्ञान होते़. त्याच्या जोडीला श्रीगणेश व श्री दत्तात्रेयांची अखंड उपासना त्यांनी केली़. श्री दत्तमहाराजांच्या मातोश्रीही अत्यंत पतिनिष्ठ, धर्माचरणी, दैवीगुणसंपन्न होत्या़. या दोघांना प प श्रीवासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांचे कृपाछत्र लाभले होते़. त्यांच्या आज्ञेप्रमाणेच पुत्रप्राप्तीसाठी जे या उभयतानंी जपजाप्य, यज्ञयागादि अनुष्ठान केले त्याचा प्रसाद म्हणून श्रीदत्तमहाराजांचा जन्म झाला़.

शिक्षण व उपासना 

श्रीदत्तमहाराजांचे बालपण व प्राथमिक शिक्षण वाडीत झाले़. प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे प्रिय शिष्य श्री दीक्षितस्वामी महाराजांचा त्यावेळी वाडीत व औरवाड येथे निवास होता़. त्यामुळे श्रीदत्तमहाराजांना त्यांचेही मार्गदर्शन व कृपाछत्र लाभले़. श्रीदीक्षित स्वामी श्री दत्तमहाराजांचे दीक्षा गुरु होते़. श्रीदीक्षित स्वामीमहाराजांनी वाडीतल्या लहान मुलांवर ईशभक्तीचे संस्कार खोलवर रुजवले़. पुढचे शिक्षण श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य जेरेस्वामी महाराजांच्या संस्कृत पाठशाळेत झाले़. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने कोणताही विषय ते अल्पावधित आत्मसात करीत़. ते श्रेष्ठ गुरुभक्त होते़. श्रीमहाराजांनी पहिला श्रीमत् भागवत सप्ताह औरवाड येथे वयाच्या १६ व्या वर्षी केला़. श्रीदीक्षित स्वामींनी अत्यंत प्रसन्न होऊन त्यांना ’’तुला पूर्ण ज्ञान होऊन तुझे सर्वतोपरि कल्याण होईल’’ असा आशीर्वाद दिला़.

श्रीमहाराजांचा व्याकरणादि विषयांचा अभ्यास सांगलीच्या श्री अभ्यंकरशास्त्रींकडे व पुढील सर्व शास्त्रांचे अध्ययन धारवाडच्या श्री नागेशशास्त्री उप्पेनबेटगिरींकडे झाले़. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून शृंगेरीच्या आचार्यांनी ’’आपल्या विद्यावंशामध्ये दत्तात्रेयशास्त्री हे प्रदीपक शिष्यरत्न आहे’’ असे प्रशंसोद्गार काढले होते़.

तत्कालीन प्रथेप्रमाणे योग्य वयात त्यांचा विवाह होऊन सौ लक्ष्मीआईसाहेबांची त्यांना शेवटपर्यंत उत्तम साथ मिळाल्याने प्रपंचही श्रीसमर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ’’नेटका’’ उत्तमरीत्या झाला़. पुढे पुण्यात आल्यावर मीमांसा विद्यालयातील श्री सुब्बाशास्त्रींजवळ श्रीमहाराजांचे मीमांसाशास्त्राचे अध्ययन झाले़.

नंतर त्यांनी निवृत्तीकाळापर्यंत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अध्यापन केले़. अध्यापनाच्याबरोबरच दैनंदिन उपासनेत कधी खंड पडला नाही़. प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे प्रिय शिष्य प पू श्रीगुळवणीमहाराजांशी पूर्व परिचयामुळे निकटचा संपर्वâ आला आणि श्रीगुळवणीमहाराजांनी श्री दत्तमहाराजांची योग्यता जाणून आपला उत्तराधिकारी नेमले़.

अध्यात्मिक कार्य 

१. श्रीदत्तमहाराजांचे जीवन विविध प्रकारच्या कार्याने भरलेले आहे़. श्रीगुळवणीमाहराजांच्या आज्ञेने त्यांनी प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे समग्र वाङमय एकत्रित करुन संपादित करुन १४ खंडांमध्ये प्रसिद्ध केले़.

२. ’’वेदांत पारिजात सौरभ’’ या निंबार्काचार्यांच्या ब्रम्हसूत्रावरील भाष्याचा मराठी अनुवाद केला़. या ग्रंथाला श्रीदत्तमहाराजांनी लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना त्यांच्या वेदांताच्या सखोल अभ्यासाचा व विव्दत्तेचा परिचय करुन देणारी आहे़.

३. ’’सर्वदर्शन संग्रह’’ या ग्रंथावरही त्यांनी विव्दत्ताप्रचुर टीका लिहिली आहे़.

४. १६ व्या वर्षापासून ते ८२ व्या वर्षापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर असंख्य श्रीमत् भागवत सप्ताह केले़.

५. प पू श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांच्या अभंगांवर त्यांनी अनेक प्रवचने केली आणि प्रवचनांच्या माध्यमातून ईशभक्तीचे वर्धन केले, सामान्य लोकांना सन्मार्गाला लावले, समाज प्रबोधन केले़.

६. त्यांच्या ठिकाणी भक्तीचा त्रिवेणी संगम पहायला मिळतो़. कुलपरंपरेप्रमाणे श्री धुडिराजमहाराजांचे व पुढे श्रीगुळवणीमहाराजांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भक्तोद्धाराचे अखंड कार्य केलेच पण त्याचबरोबर त्यांची स्वत:चीही शिष्य परंपरा निर्माण झाली़.

७. त्यांच्या विव्दत्तेचा किर्ती सुगंध फक्त भारतातच नव्हे तर देशोदेशी पसरला होता़. त्यामुळे नुसते भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोप-यातून जिज्ञासू त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता येत आणि कृतार्थ होऊन जात़.

८. प पू श्रीगुळवणीमहाराजांवरच्या गुरुभक्तीचे प्रतीक म्हणून पुण्यात श्रीवामन निवास ही भव्य वास्तू त्यांच्या संकल्पाने उभी राहिली़.

९. औरवाड येथील श्रीदत्तअमरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला़.

१०. आदि शंकराचार्यांच्या विचारप्रणालीला अनुसरुन त्यांनी शेवटपर्यंत ज्ञानदानाचे कार्य केले़ त्याचबरोबर दु:खी आर्त जीवांचे दु:ख शास्त्रीय उपाय सांगून दूर केले व त्या निमित्ताने अनेक जीवांना त्यांनी ईशभक्तीकडे प्रवृत्त केले़.

११. त्यांची सर्व सामान्यांना उपदेश करणारी, भक्तीमार्गाचे मार्गदर्शन करणारी प्रवचने पुस्तकरुपाने प्रकाशित झाली असून ती श्रीदत्ताश्रमात उपलब्ध आहेत़.

पदव्या व सन्मान : 

१. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन यांच्या हस्ते भारत सरकारकडून संस्कृत भाषेतील असाधारण नैपुण्य मिळवल्याबद्दल ’’विद्यावाचस्पती’’ पदवी १९६१ साली मिळाली़.

२. पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेने त्यांना ’’न्यायचूडामणी’’ पदवी बहाल केली़.

३. व्दारका पीठाच्या श्री शंकराचार्यांकडून ’’महामहोपाध्याय’’ पदवी प्रदान करण्यात आली़.

४. प्रयागच्या विव्दत् सभेने त्यांना ’’ब्रम्हर्षी’’ पदवी दिली़.

५. कांचीकामकोटी पीठाधीश्वर श्रीशंकराचार्यांकडून सुवर्ण वंâकण व सन्मानपत्र प्राप्त झाले़.

६. भारत सरकारकडून ’’राष्ट्रीय शिक्षक’’ व ’’राष्ट्रीय पंडित’’ पुरस्कार मिळाला.