मेनू बंद

दिनचर्या

मुख्य हरि कथा निरुपण ।:

कलियुगामध्ये सर्व संत मंडळींनी हरि नामस्मरण हा अत्यंत सोपा आणि सरळ मार्ग अध्यात्म प्राप्तीसाठी सांगितला आहे़. नामस्मरणाने केवळ स्मरण करणा-याचेच कल्याण होते असे नसून संपूर्ण परिसराची शुद्धि होते़. याचा अनुभव श्रीदत्ताश्रमामध्ये येणा-या प्रत्येकाला येतो़ श्रीदत्ताश्रमामध्ये सर्व सामान्यांना उपासना म्हणून प पू ताईमहाराज सतत नामस्मरणाचा आग्रह धरतात आणि प्रत्येकाला त्याच्या आवडेल त्या मार्गाने नामस्मरणाला लावतात़.

इथे दिनचर्येमध्ये पहाटे पांच वाजल्यापासून देवाच्या काकडारतीच्या रुपाने नामस्मरणाची सुरवात होते़. आधी पुरुष मंडळींचा काकडा होऊन सकाळी ६ च्या सुमारास स्त्रियांचा काकडा सुरु होतो़ उत्सवात आणि कांही विशेष प्रसंगी मंदिरातून प्रभात फेरी निघते़. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात सर्व भक्त मंडळी देवदर्शन घेऊन पूर्ण दत्ताश्रमास प्रदक्षिणा घालतात़. पुढे दिवसभर येणारी भक्त मंडळी देवापाशी बसून जमेल तेवढा जप करतात़.

इथे येणा-या प्रत्येकाने आपला जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये घालवावा अशी प पू ताईमहाराजांची स्पष्ट सूचना आहे़. सायंकाळी ४:३० वाजता श्रीदत्तनामसंकिर्तन व पंचपदीचा कार्यकम असतो़. सायंकाळी ६:४५ वाजता श्रीराघवालयातून आरती सुरु होते जी पुढे संतधाम आणि पादुका मंदिर करुन श्री अभिरामेश्वर मंदिरात संपते़ त्या नंतर स्थानिक भक्तगणांतर्फे त्रिपदी होते़.

दर गुरुवारी रात्री ९ ते ९। दरम्यान सुरु होणारी आरती ११ पर्यंत चालते़ आठवड्यातील प्रत्येक शनिवारी रात्री १० वा ‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा‘‘ ही धून सुरु होऊन पहाटे पांच वाजता सुरु होणा-या काकडारतीपर्यंत चालते़. आश्रमाच्या दिनदर्शिकेत दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका रविवारी धून – नामस्मरणाचा सामुहिक कार्य ्रकम करण्यात येतो़. कांही विशिष्ट वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने अखंड नामसप्ताह केला जातो़. नामस्मरण श्रीदत्ताश्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे़.