मेनू बंद

संकल्प

श्रीदत्ताश्रमाची स्थापना श्रीराम नवमी, एप्रिल १९९४ मध्ये झाली़.

ईश नियोजित व श्री सद्गुरुकृपाफळाने प पू ताईमहाराज चाटुपळे यांच्या रुपाने अलिकडच्या काळात फार मोठा अध्यात्मिक अधिकार असलेली विभूती समाजाला लाभली आहे़. विश्वनियंत्याला त्या पूर्ण समर्पित असून संतांच्या शिकवणुकीनुसार समस्त जीवांच्या कल्याणाकरता त्या कार्यरत आहेत़.

समाजामध्ये ईश्वराबद्दल, सद्गुरुंबद्दल भक्ती व प्रेम निर्माण होऊन वृद्धिंगत व्हावी, लोकांमध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होऊन ती वाढीस लागावी, सद्गुणांचा विकास व्हावा, व एवूâणच सर्व जीवांचे कल्याण व्हावे अशी भारत वर्षांत संतांची शिकवणूक राहिली आहे़. हा आदर्श डोळयासमोर ठेवून श्रीदत्ताश्रमाची स्थापना झाली आहे़.

सकारात्मक भावनिक अवस्था व व्यक्तीचे शारिरीक आरोग्य यांचे परस्पर निकटचे संबंध आता आधुनिक वै़द्यक शास्त्राने मान्य केले आहेत़. त्यामुळे रोजच्या ताणतणावाच्या जीवनापासून तसेच प्रदुषणयुक्त वातावरणापासून मुक्त असे स्थान समाजाला उपलब्ध करुन देऊन त्या व्दारे लोकांना मन:शांती मिळावी व त्याच्या जोडीला शुद्ध शाकाहारी आहार यांचा लाभ, तसेच शारिरीक व मानसिक आरोग्य लाभावे, आणि फलत: सकारात्मकता वाढून नवचैतन्य निर्माण व्हावे हाही एक उद्देश दृष्टीसमोर ठेवण्यात आलेला आहे़. या स्थानात कोणत्याही प्रकारचे मांत्रिक अथवा तांत्रिक चमत्कार केले जात नाहीत परंतु प पू ताईमहाराजांचे दर्शन व नामसंकिर्तनाच्या मंगलमय लहरी यामुळे अनेकांना स्वत:मध्ये सात्विक बदल झालेले अनुभवास येतात़.

प पू श्रीदत्तमहाराजांनी श्रीदत्ताश्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी काढलेले उद्गार बरेच कांही सांगून जातात़. ते म्हणाले होते, ’’प पू सौ ताईमहाराजांच्या तप:प्रभावाने हे स्थान निर्माण झाले असून इथे सर्व देवतांचा निवास आहे़. हे पुढे परमार्थाचे मोठे केंद्र होणार आहे’’

त्यांचे हे शब्द अल्पावधितच खरे झालेले आज इथे पहायला मिळतात़.