मेनू बंद

सामान्यत: आश्रमाच्या व प पू ताईमहाराजांच्या संबंधात वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

 

१. प पू सौ ताईमहाराज कोण आहेत ?

त्या एक तपस्विनी आहेत़.

२. त्यांना ‘‘ताईमहाराज‘‘ हे नांव कोणी दिले ?

समाजातील त्यांच्याबददल आदरभावना असणा-या भक्तांनी पण जास्त करुन भक्त त्यांना प्रेमाने ‘‘ताई‘‘ च म्हणतात़.

३. एक गृहिणी असूनही त्यांनी एवढी उपासना कशी केली ?

त्यांनी सांसारिक सर्व जबाबदा-या सांभाळून जास्तीत जास्त नामस्मरण केले.

४. त्यांचे लौकिक शिक्षण किती ?

अथांग जनसमुदायाला यशस्वी व सुखी जीवनाचे शिक्षण देणा-यांना लौकिक शिक्षणाची आवश्यकता नसते़.

५. त्यांनी अध्यात्मिक शिक्षण कोणाकडून घेतले ?

विदर्भ मराठवाड््यातील विख्यात संत प पू श्री धुंडिराज महाराज आणि प पू श्री काजळकरमहाराजांकडून.

६. श्रीदत्ताश्रमाचा उददेश काय ?

रोजच्या ताण तणावाच्या जीवनापासून तसेच प्रदूषणयुक्त वातावरणापासून मुक्त असे स्थान समाजाला उपलब्ध करुन देऊन त्या व्दारे लोकांना मन:शांती मिळावी, नामसंकिर्तनाच्या मंगलमय लहरी व त्याच्या जोडीला शुद्ध शाकाहारी आहार यांचा लाभ, तसेच शारिरीक व मानसिक आरोग्य लाभावे व फलत: सकारात्मकता वाढून नवचैतन्य निर्माण व्हावे हा उददेश दृष्टीसमोर ठेवण्यात आला आहे़. समाजामध्ये ईश्वराबद्दल, सद्गुरुंबद्दल भक्ती व प्रेम निर्माण होऊन वृद्धिंगत व्हावी़ लोकांमध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होऊन ती वाढीस लागावी,सद्गुणांचा विकास व्हावा, व एवूâणच सर्व जीवांचे कल्याण व्हावे अशी भारत वर्षांत संतांची शिकवणूक राहिली आहे़. हा आदर्श डोळयासमोर ठेवून श्रीदत्ताश्रमाची स्थापना झाली आहे़.

७. इथे आल्याने काय मिळते ?

आनंद, शांती व समाधान.

८. श्रीदत्ताश्रमात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश आहे काय ?

होय़.

९. प्रवेश असेल तर मुक्काम करता येईल का ?

इथे मुक्कामाची व्यवस्था नाही .

१०. प पू सौ ताईमहाराजांची मुले काय करतात ?

ती सर्व विवाहित गृहस्थाश्रमी असून नोकरी करतात़.

११. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय ?

या मूळच्या मराठवाड््यातील अंबड तालुक्यातील काजळ गांवच्या असून त्यांचे वडिलही प पू श्री काजळकर महाराज म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले़.

१२. श्रीदत्ताश्रमात आल्यावर आमचे सांसारिक प्रश्न सुटतील काय ?

हे ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून आहे़. जशी भावना तसे फऴ.

१३. प पू सौ ताईमहाराज आमच्या घरी येतील का ?

त्या त्यांचे स्थान सोडून कुठेही जात नाहीत़.

१४. प पू सौ ताईमहाराज गुरु मंत्र देतात का ?

पादुकांंवर पाणी घालून माळ लावून मंत्र घेता येतो.

१५. श्रीदत्ताश्रमाची जाहिरात कां करत नाही ?

आवश्यकता नाही़ जाहीरात न करताच इथे देशाच्याच काय पण जगाच्या काना कोप-यातून लोक येतात़.

१६. कांही संतांच्या भक्तांप्रमाणे घरोघरी जाऊन या आश्रमाची माहीती कां देत नाही ?

आधी म्हटल्याप्रमाणे याची आवश्यकता नाही़ जिथे खरे देवत्व असते तिथे ज्याच्या प्राक्तनात असेल तो येऊन पोहोचतो़.

१७. पादुका कोणाच्या आहेत ?

श्रीदत्तात्रेयांच्या़

१८. मला सर्व कांही अनुकूलता आहे मला देवाकडे कांहीही मागायचे नाही पण मदत करायची इच्छा असेल तर मी श्रीदत्ताश्रमाला काय मदत करु शकतो ?

तुमच्या इच्छेप्रमाणे यथा शक्ती करता येईल़.

१९ इथे एवढे यज्ञ याग कशासाठी केले जातात ? त्यांचे महत्व काय ?

वैश्विक कल्याण, शांती आणि पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याकरता़.

२०. सोवळे ओवळे ज्याच्याकडून पाळले जात नाही अशी व्यक्ती जालन्याला येऊ शकते का ?

योग्य स्वरुपात प्रसंगानुसार शास्त्राप्रमाणे सोवळया ओवळयाचे पालन करणे आवश्यक असते़.

२१. पादुकांवर कोण पाणी घालू शकतो ?

सर्वांना सकाळी स्नान करुन सोवळयात पाणी घालायला परवानगी आहे़.

२२. पादुकांवर पाणी घालण्याचे महत्व काय ?

पूजेतला तो एक उपचार आहे़.

२३. नवीन व्यक्तीला श्रीदत्ताश्रमात आपण आणू शकतो का ?

त्याला आश्रमाचा पत्ता देऊन येण्यास सांगायला हरकत नाही़. कृपया आश्रमाला भेट देण्यापूर्वी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा .

२४. आश्रमाचा खर्च कशावर चालतो ?

दानावऱ.

२५. एखाद्या उत्सवात अन्नदानाचा खर्च कोणी इच्छुक करु शकतो का ?

प पू सौ ताईमहाराजांच्या अनुमतीने करता येतो़.

२६. श्रीदत्ताश्रमात येणा-या भक्तांकडून अपेक्षा

हा आश्रम आहे़ इतरत्र न मिळणारी शांती इथे मिळावी आणि आलेल्या भक्तांकडून जास्तीत जास्त उपासना व्हावी म्हणून उपर्निदीष्ट सुखसोयी पुरवल्या जातात़. तेव्हां या परिसरात आल्यानंतर अनावश्यक गप्पा गोष्टी, चौकशा करण्यात वेळ न घालवता इथल्या दैनंदिन कार्यक्रमात सहभागी व्हावे व आपली उपासना करुन मन:शांती, समाधान प्राप्त करुन घ्यावे एवढीच माफक अपेक्षा आलेल्या भक्तांकडून आहे़.